Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरवला स्वीकृत नगरसेवक महेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन …आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनीही घेतला शिबिराचा लाभ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक ‘महेश जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य सेवा … हीच ईश्वर सेवा’ मानून पिंपळे गुरव येथे आजपासून ( ८ व ९ सप्टेंबर) ला त्यांच्या वतीने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार ‘लक्ष्मण जगताप’ तसचे शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपळे गुरव येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड मनपा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक शशिकांत आप्पा कदम, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेवक सागर अंगोळकर, नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेविका उषा मुंढे, सतीश कांबळे, डॉ.प्रदीप ननावरे,पत्रकार संतोष महामुनी, मासाळ,सहभागी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिवाजी कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Google Ad

या शिबिरात विविध ठिकाणच्या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात आमदार लक्ष्मण जगताप यांनीही लाभ घेतला. सकाळी ९वाजले पासूनच रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. यावेळी तपासणी करून आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत, असे संयोजक महेश जगताप यांनी सांगितले.

▶️शिबीरात या रुग्णालयांनी घेतला सहभाग :-
* लोकमान्य हॉस्पिटल ( चिंचवड ) *डि.वाय.पाटील ( संततुकाराम नगर )
* ज्युपीटर हॉस्पीटल ( बाणेर ) *एच.व्ही.देसाई हॉस्पिटल ( महमंद वाडी )
*आदित्य बिरला हॉस्पिटल ( चिंचवड )
* रुबी एल.केअर ( वायसीएम )

▶️शिबीरात होणाऱ्या तपासण्या व शस्त्रक्रिया :-

 

* कान , नाक , घसा
* डोळे तपासणी , शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप
* हाडांचे व मणक्याचे आजार
* दंतरोग तपासणी
* फिजिशियन
* बी.पी. ,
* शुगर तपासणी
* हृदयरोग तपासणी मोफत एंजोग्राफी
* ई.सी.जी.
* मशिनद्वारे हाडांचा ठिसूळपणा तपासणी ( BMD )
* शिबीरात महिलांसाठी विशेष तपासण्या
* गरोदर माता व भगिनींचे आरोग्य तपासणी उंची , वजन , बीपी , बीएमआय रैंडम ब्लडशुगर ,
• अत्याधुनिक वेलस्कोपमशिन द्वारे ओरल कॅन्सर स्क्रीनिंग ,
• अत्याधुनिक आय – ब्रेस्टच्या द्वारे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग ,
• कर्करोगाचे स्तनपान ( मॅमोग्रॉफी ) ४० वर्षावरील महिलांसाठी गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग स्क्रीनिंग अत्याधुनिक मशिनद्वारे केली जाईल .

आज दिवसभरात ११०० रुग्णांनी या शिबिरात सहभाग घेऊन लाभ घेतला. हे शिबीर  ०९ सप्टेंबर पर्यंत चालू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आयोजक महेश जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!