Google Ad
Uncategorized

नव्याने DPC बैठक घेऊन बाबासाहेब कांबळे यांना पदोन्नती देण्याचे पिंपरी चिंचवड मनपाला कोर्टाचे आदेश … गणेश देशपांडेंची उचलबांगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नव्याने DPC बैठक घेऊन सिनियर असलेल्या आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांना तात्काळ पदोन्नती देण्याचे आदेश 20 जुलै 2023 ला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, धीरज सिंग ठाकूर यांच्चा खंड पिठाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश शंकर देशपांडे यांना दिलेली पदोन्नती मुंबई उच्च न्यायालयाचे बेकायदेशीर ठरवली आहे.

आज महापापालिकेत dpc बैठक होणार आहे त्या मध्ये मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी म्हणून बाबासाहेब कांबळे यांची निवड होणार असल्याची महानगरपालिका वर्तुळात चर्चा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपलिका प्रशासनाने १८ महिन्या पूर्वी गणेश देशपांडे यांना बेकायदेशीरपणे सर्व नियम डावलून पदोन्नती दिली होती. ती मुंबई हायकोर्टाने रद्द केली आहे. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह तयार होत आहे.

Google Ad

आज होणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या ( DPC) बैठकीत कारवाई होणाऱ्या गणेश देशपांडे यांच्या जागी बी बी कांबळे यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.महानगरपालिकेचे क क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे यांना आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला होता.

मात्र, त्यांचा पदभार काढून घेत कांबळे यांची सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हता डावलून प्रशासन विभागाने पदोन्नती समितीच्या शिफारसीनूसार देशपांडे यांनाआरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर 12 नोव्हेंबर 2021 मध्ये पदोन्नती दिली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!