महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल पायलट लायसन्स या विषयावर विशेष सेमिनार आयोजित केले जात आहे. रविवारी (दि. २१) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पीएमसी मेट्रो स्टेशन जवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम, शिवाजीनगर, पुणे येथे सेमिनार पार पडणार आहे.
सेमिनारचे नेतृत्व यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे करतील. त्यांनी विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज सुविधा, गुंतवणूक, भावी उत्पन्न संधी आणि भारतासह विदेशात उपलब्ध करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सेमिनारमध्ये कॅप्टन अतुल वास्कले, रश्मी इंदुलकर आदी वैमानिक देखील सहभागी होणार आहेत.

यादरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. व्यवस्थापक सुजित शेंडकर, एव्हिएशन म्युझियमचे बाळासाहेब देवरस यांनी सांगितले की, युवकांना या क्षेत्रात आवड असली तरी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे असे सेमिनार त्यांच्या करिअरला दिशा देतील.


