Google Ad
Uncategorized

लोकनेते ‘लक्ष्मण जगताप मित्र परिवार’ आणि ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ घेणार … पुणे ते पंढरपूर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जून) : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे (दि.१० व ११ जून) प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात अनेक दिंड्यांसमवेत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत.पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २० दिवस पायी प्रवास करून वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात पोहोचणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड च्या लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वारकऱ्यांची हाक ऐकली असून वारकऱ्यांना संपूर्ण वारी प्रवासात आरोग्य सेवा पुरवणार आहेत.

पिंपरी चिंचवडहून आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टची आरोग्यवारी तयार असून, १० जून देहू तर ११ जून ला आळंदी येथे सुरुवात करून वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर अशी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. “वैद्यकीय पथक त्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवण्यात आली असून यात मागील वर्षी पेक्षा अधिक मोठया प्रमाणात आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

Google Ad

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी सोहळ्याला वारीत लाखावर भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वारी प्रवासात पालखीचा मुक्काम असतो दरम्यान, यावर्षी पाऊस उशिरा येणार असल्याने वारकऱ्यांना उन्हाच्या झळा आणि उष्णता सहन करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही पालख्यांचे मुक्कामाच्या ठिकाणांच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला वारकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!