Categories: Editor Choice

स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्याकरिता … शनिवारी १४ जाने. रोजी सायंकाळी ०६ वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन … अनेक दिग्गज उपस्थित राहणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ जानेवारी२०२३) : पिंपरी चिंचवडचे लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांचे दि. ०३ जानेवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्याकरिता शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवडगाव, पुणे येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या शोकसभेस मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. अजितदादा पवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य,प्रा. डॉ. तानाजीराव सावंत मंत्री सार्वजनिक आरोग्य महाराष्ट्र राज्य, मा. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री पुणे जिल्हा, मा. भाई जगताप अध्यक्ष मुंबई काँग्रेस आमदार विधानपरिषद महाराष्ट्र, मा. बाळा नांदगावकर मनसे नेते व मा. आमदार, मा. अविनाश महातेकर मा. राज्यमंत्री महाराष्ट्र राष्ट्रीय सरचिटणी आर.पी.आय, मा. दिलीप बंड मा. विभागीय आयुक्त पुणे विभाग, मा.श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा, मा. आण्णा बनसोडे आमदार पिंपरी विधानसभा, मा. उमाताई खापरे आमदार विधानपरिषद तसेच पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्थाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 days ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

1 week ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

1 week ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago