महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ऑगस्ट) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पुणे केन्द्र पिंपळे गुरव येथे लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने सुरू झाले, असून विद्यार्थीची निवड प्रक्रिया ०५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरु करण्यात आली आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी आपल्याच परिसरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून लोकनेते लक्ष्मण जगताप हे नेहमी प्रयत्नशील असायचे त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याने शहरातील विद्यार्थ्यांना ही या गोष्टीचा आनंद झाला आहे.
या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पुणे केन्द्र पिंपळे गुरव येथील केंद्रात पहिल्या टप्यात बी टेक – आईटी, बीटेक- कंप्यूटर टेक्नोलाजी, बीबीए – रिजेल व एमटेक – बीग डेटा, एम टेक – सायबर सिक्यूरिटी, एम टेक – ए. आय असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
300 विद्यार्थी संख्या प्रथम वर्षी या उपकेंद्रात असून पुढे अनेक अभ्यासक्रम चालू २०२३ या वर्षापासून देण्यात येणार आहेत. कौशल्यावर आधारित व रोजगार निर्मिती करणारे या सर्व अभ्यासक्रमसून विद्यार्थ्यांना एक अनुभव मिळणार असून यात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. ओन-द-जॉब ट्रेनिंग ची संकलपना असून या विद्यापीठात राबवली जाणाऱ्या शिक्षणा बरोबरच उद्योगक्षेत्रात प्रशिक्षण मिळणार आहे.
दुसऱ्या टप्याची निवड प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२३ ला सुरू होणार असून अर्ज भरण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या https://mssu. ac.in या संकेतस्थळावर महिती उपलब्ध असणार आहे.
कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर म्हणाल्या की, “पिंपळे गुरव च्या या उपकेन्द्रात अनेक अभ्यासक्रम सुरू होणार असून याचा उपयोग आणि लाभ पुणे व पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांना होईल. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम केल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा”.
कौशल्य रोजगार नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुणे उपकेन्द्राच्या अभ्यासक्रमांना उपयुक्त वेळी आरंभ झाला आहे, असे म्हटले असून उद्योगाशी निगडीत अभ्यासक्रम हे पिंपळे गुरव येथे उपलब्ध असून विद्यार्थीनी या संधी चा उपयोग करवा असे आवाहन केले आहे.