महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात झाली. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत दिंड्या पुणे मुक्काम उरकून आज लोणी काळभोर आणि सासवड येथे दाखल झाल्या. जगद्गुरू श्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.
वारीत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. पुणे शहरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान दिवे घाट मार्गे सासवड ला तर तुकोबांच्या पालखीचे ने आज लोणी येथे विसावा घेतला. जय हरी विठ्ठलाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने अवघड असा दिवे घाट पार केला, त्याबरोबर वैष्णवाचा मेळाही हा अवघड घाट अगदी आनंदात पार करत होता.
दिवे घाटातील दरवर्षी वारकरी ज्या दिवसाची वाट बघत असतात, आज हा सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. मोठा टप्प्या पार केल्यावर अनेकांना या चढाई चा थोडाफार त्रास झाला, या वारकऱ्यांच्या थकव्यावर चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने या वारकऱ्यांना मोफत औषधे व सर्व उपचार देऊन मानवतेचे दर्शन घडविल्याचे आज पाहायला मिळाले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही आरोग्य सेवा रात्री ११ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होती.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…