पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दरमहा एकत्रित मानधनावर वैद्यकीय विभागात विशेष भरती मोहीम सुरु …

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कोविड-१९ करिता तात्पुरत्या स्वरुपात दरमहा एकत्रित मानधनावर पदे भरण्याकरिता विशेष भरती मोहीम सुरु करण्यात आली आहे. वाढलेल्या रुग्णांमुळे रुग्णांलयावर येणारा ताण त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक तसेच लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन ही भरती करण्यात येत आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत , असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्धवलल्या कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येणार आहे. समुपदेशक पदाची ४० पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती पदे हंगामी स्वरुपात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज वैद्यकीय मुख्य कार्यालय, दुसरा मजला, पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, पिंपरी ४११०१८ या पत्त्यावर दिनांक ३१ जुलै पर्यंत येऊन अथवा ई-मेलद्वारे (medical@pcmindia.gov,in) करु शकता. ही भरती पालिकेच्या कोविड-१९च्या रुग्णांकरिता सुरु करण्यात आलेली आहे. रुग्णालयासाठी करण्यात येणार आहे, असे पालिकेने दिलेल्या जाहिरातीत नमुद करण्यात आले आहे.

पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2X3WusI
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : medical@pcmcindia.gov.in

वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

2 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

2 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

3 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago