Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘दादा’ आज सकाळी ११ वा. करणार पिंपरी चिंचवड मधील कोविड सेंटरच्या उभारणीची पाहणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.७ ऑगस्ट : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चाललाआहे . रूग्णवाढीचा आकडा लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयवर कोरोनाचे तात्पुरते रूग्णालय (कोविड केअर सेंटर) तयार करण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेने युद्धपातळीवर या कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. या कोविड सेंटर च्या उभारणीचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज शुक्रवारी सकाळी ११ वा. पिंपरी चिंचवड मध्ये येत आहेत.

यावेळी ते या सेन्टरची पाहणी करून कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्यावरही चर्चा करणार आहेत. पिंपरीचिंचवड ही औधोगिक नगरी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे कामधंदा व नोकरीव्यवसाया करण्यासाठी अनेक लोक येथे स्थायिक झाले. पर्यायाने शहरातील लोकसंख्या वाढली त्यामुळे या महामारीत कोरोनाचे रुग्णही वाढले. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, नेहरूनगर येथे हे रूग्णालय मगर स्टेडियमच्या सव्वा पाच एकर जागेवर उभारण्याची तयारी सुरू आहे. त्याची पाहणी आज अजित पवार हे करणार आहेत, त्यावेळी ते राज्यसरकारकडून काय देतात याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!