Google Ad
Editor Choice

पवन साळुंके यांच्या ‘शिवसाम्राज्य वेल्फेअर ट्रस्ट’ ने दिला अनोखा संदेश! … कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडीचा उत्सव रद्द करून घेतले रक्तदान शिबिर!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट) : ‘शिवसाम्राज्य वेलफेअर ट्रस्ट’ व ‘अखिल नवी सांगवी दहिहंडी उत्सव समिती’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र . ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये ट्रस्ट हे लहान मुले व नागरिकांकरिता विविध प्रकारचे खेळांचे व विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम व पुरग्रस्तांना व अनाथ आश्रमांना मदत करत आले आहेत .

परंतु गतवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसाम्राज्य वेल्फेअर ट्रस्ट यांनी आपला दहिहंडी उत्सव कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या नियामवली नुसार रद्द केला आहे . नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन लहान मुले व मोठ्यांच्या कलेची प्रगती आजवर हे ट्रस्ट करत आले आहे .

Google Ad

या वर्षी ट्रस्टने कोरोनाच्या संकटामुळे आपल्या भारत देशावर व महाराष्ट्रावर जे महाभयंकर असे संकट आले त्यात थोडा फार खारीचा वाटा म्हणून पवन साळुंके मित्रपरिवार व सभासद यांच्या सहयोगाने ज्युपिटर हॉस्पिटल , बाणेर , पुणे येथे दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यास रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

या रक्तदान शिबिराच्या वेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष पवन साळुंके म्हणाले, की यासाठी नोंदणी करावयाची असल्यास आम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा . या कारोना संकटाचे निवारण होऊन आपण लवकरच आपल्या बाळकृष्णाचा जन्मदिवस थाटामाटात साजरा करु हिच सर्व ईश्वरचरणी प्रार्थना!

या रक्तदान शिबिरास ट्रस्ट कार्यकारिणीचे कु . अभिलाव पानसरे कु . अक्षय घोरपडे कु . संकेत मोटे ( अध्यक्ष ) ( उपाध्यक्ष ) ( कार्याध्यक्ष ) कु . शुभम कवडे कु . बारवीकेश साळुखे कु . साहिल पटेल ( खजिनदार ) ( आयोजक ) ( सचिव ) आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभल्याचे पुर्वा पवन साळुंके ( संस्थापिका : शिवसाम्राज्य ट्रस्ट) व पवन साळुंके यांनी सांगितले.

रक्तदान शिबिर :- मंगळवार दि . ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ज्युपिटर हॉस्पिटल , बाणेर , पुणे चालू असणार आहे

संपर्क : 9921808080/9130157775

Google Ad

About the author

Maharashtra14 News

43 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!