महानगरपालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तसेच वैयक्तिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना विपणन कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील ११ ते १५ जानेवारी या कालावधीत सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन करणाऱ्या बचतगटांना पवनाथडी जत्रेतील स्टॉलचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आले त्यावेळी चारठाणकर बोलत होते.
पवनाथडी जत्रेत महिला बचतगटांना वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्टॉल्सची सोडत उप आयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते लकी ड्रॉ द्वारे महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे काढण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
पवनाथडी जत्रेत वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे अर्ज सादर केले होते. त्यानुसार सुमारे ७५० पेक्षा अधिक बचत गटांना लकी ड्रॉद्वारे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…