Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथे होणाऱ्या पवनाथडी जत्रेतील स्टॉलचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ८ जानेवारी २०२४) :- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना उत्तम बाजारपेठ पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महापालिका उपलब्ध करून देत आहे. उत्पादनांची गुणवत्ता आणि विपणनाचा कौशल्यपूर्ण वापर करण्यावर बचत गटांनी भर द्यावा. ही जत्रा पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून स्टॉल धारक बचतगटांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तसेच वैयक्तिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना विपणन कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील ११ ते १५ जानेवारी या कालावधीत सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन करणाऱ्या बचतगटांना पवनाथडी जत्रेतील स्टॉलचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आले त्यावेळी चारठाणकर बोलत होते.

Google Ad

पवनाथडी जत्रेत महिला बचतगटांना वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्टॉल्सची सोडत उप आयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते लकी ड्रॉ द्वारे महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे काढण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला बचत गटांच्या उत्पादनांना एक खुले व्यासपीठ महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे महिला बचत गट सक्षम बनत असून त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना प्रसिद्धीदेखील मिळत आहे, असेही उप आयुक्त चारठाणकर यावेळी म्हणाले.

पवनाथडी जत्रेत वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे अर्ज सादर केले होते. त्यानुसार सुमारे ७५० पेक्षा अधिक बचत गटांना लकी ड्रॉद्वारे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली.यावेळी उपस्थित महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या हस्तेही लकी ड्रॉमध्ये असलेल्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली आणि पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची निश्चिती करण्यात आली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!