महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी प्रलंबित मागण्या करीता मोर्चा काढला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. पवनानगर बाजारापेठेतून मोर्चा काढण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. दररोज १२०० क्युसेकप्रमाणे वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग केला जातो. मात्र, मंगळवारी सकाळी धरणग्रस्तांनी पवनानगर बाजारपेठेतून धरणापर्यंत मोर्चा काढला आणि प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. धरणग्रस्त ८६३ शेतकऱ्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळावी, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी, यासह विविध मागण्या त्यांनी केल्या.
आमदार सुनील शेळके यांनी आंदोलकांचे नेतृत्व केले. मोर्चेकरांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी शेळके यांनी, ‘आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. आम्हाला गोळ्या घाला,’ असे म्हणत मोर्चेकऱ्यांना धरण परिसरात घेऊन गेले. न्याय मिळेपर्यंत धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. धरणावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढून कुलूप लावले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे धरणग्रस्तांशी साधला संवाद. जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक १९ मे रोजी बोलावून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…