महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑगस्ट) : वरुणराजाच्या कृपेने मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकराची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. ‘पवना धरण’ हे मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणी पुरवठा करणारे महत्वाचे धरण असून, त्यामुळे येथील परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. तसेच धरण आता १०० % भरले आहे.
गेल्या आठवड्यात मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण काल (दि.२१) ९९.१४ टक्के भरले होते तर आज पातळीत वाढ होऊन ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. यावर्षी १ जून पासून आजपर्यंत एकूण २,१६२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांचा तसेच एमआयडीसीच्या वर्षभराचा पाण्याची चिंता मिटली आहे.
मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…