Google Ad
Editor Choice

‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून ‘संदीप गायकवाड’ करतायेत दापोडीतील गरीब गरजूंना मदत …

महाराष्ट्र 14 न्यूज : समाजात असेही काही लोक असतात, जे कशाचीही अपेक्षा न करता आपली सेवा आणि कर्तव्य बजावत असतात, त्यातीलच एक ‘संदीप गायकवाड’ …

दापोडीतील भिमज्योत नगर भागातील पुजा मोहिते या ताईची तब्बेत अचानक खराब झाली, रक्तदाब कमी झाल्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी झाली होती, त्यांना त्वरित वैद्यकिय उपचाराची गरज होती. अशातच संदिप गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात रुग्ण वाहिकेसाठी फोन आला,निरोप मिऴताच क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिका चालक दशऱथ तलवार यांनी सदर ठिकाणाहुन ससुन हॉस्पीटल पुणे पर्यंत वेऴेत पोहचविले.

Google Ad

या मधल्या वेळेत रुग्णवाहिका आद्ययावत असल्यामुळे त्यात ऑक्सिजन सिलेंडरही उपलब्ध होता त्यामुऴे योग्यवेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांना ऑक्सिजन लेवल पुर्ववत करता आली , त्यामुळे वेऴेत प्रथमोपचार दिल्यामुळे ससुन व्यवस्थापनाने वाहकाचे कौतुक केले. रुग्णवाहिका दापोडी परिसरात चालु केल्यामुळे त्यांचा उपयोग आज मोहिते परिवारास झाला ,त्यामुळे मोहिते कुटुंबाने संदिपदादा गायकवाड यांचे विशेष आभार मानले.अशीच सेवा संदिपदादा गायकवाड यांच्याकडुन घडो असा आर्शिवाद दिला.

!! रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा!! मानून हा आपला जनसेवक संदिपदादा गायकवाड आपल्या भागाती जनतेची सेवा करत आहे. सलाम त्यांच्या या सेवाकार्यास …

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!