Google Ad
Editor Choice

ॲड सौ निकिता चिंचवडे तसेच सागर चिंचवडे व मित्र परिवाराच्या वतीने चित्रकला आणि निबंध स्पर्धेत ४३५ स्पर्धकांनी घेतला सहभाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मार्च) : शिवजन्मोत्सव 2022 यानिमित्ताने चिंचवड गावठाण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड सौ निकिता सागर चिंचवडे तसेच काळभैरवनाथ उत्सव समितीचे सदस्य श्री सागर मधुकर चिंचवडे व मित्र परिवाराच्या वतीने दिनांक रविवारी 20 मार्च 2022 रोजी चिंचवड परिसरातील चार उद्यानांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी एकूण 435 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.दोन्ही स्पर्धांसाठी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज असे विषय देण्यात आले होते.

तसेच शिवजयंतीच्या दिवशी दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता *चिंचवड गावठाण येथे जिजाऊ पर्यटन केंद्रामध्ये पोवाडे गायन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते* त्यादरम्यान एकूण *65* स्पर्धकांनी सहभाग नोंदविला सहभागा मध्ये चार वर्षाच्या मुलापासून जेष्ठ नागरिकांपर्यंत स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

Google Ad

आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती घेतल्यामुळे नागरिकांनी आमचे तोंड भरून कौतुक केले हेच या शिवजयंतीचे आम्ही पवित्र समजतो आगामी काळात सुद्धा आम्ही अशाच प्रकारे कार्यक्रम घेत राहू असे सामाजिक कार्यकर्त्या ॲड सौ निकिता सागर चिंचवडे यावेळी बोलताना म्हणाल्या.

कार्यक्रमाला परीक्षक म्हणून श्री हरीश अप्पा मोरे, सौ निलीमा चंद्रशेखर असलेकर, श्री नारायण केशव घोटकुले शाहीर अमोल चव्हाण यांनी काम पाहिले.

प्रमुख उपस्थिती मध्ये मा. नगरसेवक मधुकर चिंचवडे मास्तर,विद्यमान नगरसेवक राजेंद्र गावडे,युवा नेते शेखर आन्ना चिंचवडे,राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे,श्री विश्वास राऊत तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड निकिता सागर चिंचवडे* यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सागर मधुकर चिंचवडे यांनी केले. युवा शिवशाहीर ओंकार चव्हाण यांच्या शिवछत्रपतींची गारद म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली, संयोजक म्हणून नवं तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कामगिरी पार पाडली…

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!