महाराष्ट्र व14 न्यूज, (दि.०९ ऑगस्ट) : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना बी. जी. शिर्के कंपनीतील अधिकाऱ्यांच्या वतीने २५००० रुपयांचा मदत निधीचा धनादेश खालापूर येथील नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे नुकताच सुर्पूत करण्यात आला.
यावेळी पद्मश्री बी. जी. शिर्के यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांकरीता मदतीचा हात पुढे करीत आपण समाजासाठी काही देणे लागतो. या उदात्त भावनेतून ही मदत करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महाव्यवस्थापक नितीन कदम, उपमहाव्यवस्थापक केशव लावंड, प्रमोद पवार, विजय बांदल यांच्या प्रयत्नातून सर्व स्टाफ व कर्मचारी यांनी स्वतः च्या पगारातून रक्कम स्वरूपात निधी एकत्रित गोळा करून धनादेश द्वारे खालापूर येथील नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रविण शिर्के यांनी यशस्वीपणे पार पाडले.
बी जी शिर्के कंपनीच्या पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागातील मारुती गाढवे, महादेव कदम, मारुती आडलिंगे, राम पाखरे, देवेंद्र सोनार, अतुल राऊत, नवी मुंबई विभागामधील श्रीनिवास मेटे, प्रशांत काळे, अनिकेत काळे, किरणकुमार मोरे, अशोक जगदेव, विशाल सोनवणे आदी अधिकारी वर्ग तसेच स्टाफ याप्रसंगी उपस्थित होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…