Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं.चिं. मनपा कोविड मोहिमेतील कर्मचाऱ्यांना देणार भत्ता … तसेच विविध विकास कामांसाठी ५ कोटी ५४ लाखांच्या खर्चास स्थायीची मान्यता!

महाराष्ट्र 14 न्यूज , दि .१४ ऑक्टोबर २०२० : शासनाच्या आदेशानुसार संपुर्ण राज्यात कोविड प्रादुर्भावावर नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम शहरात राबविण्यात येत आहे . या मोहिमेत सहभागी झालेल्या महापालिका कर्मचा – यांना मोहिम कालावधीत प्रतिदिन १५० रुपये भत्ता देण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली . या विषयासह विविध विकास कामांसाठी येणा – या सुमारे ५ कोटी ५४ लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली .

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते . महापालिका कार्यक्षेत्रामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची पहिली फेरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात आली तर दुसरी फेरी १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे . या मोहिमेसाठी महापालिका कर्मचा – यांची नेमणुक करण्यात आली आहे . घरोघरी भेटी देवून आरोग्य शिक्षण , महत्वाचे आरोग्य संदेश , संशयीत कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह , हदयविकार , किडनी आजार , लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या व्यक्ती शोधुन काढणे , त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार याबाबींचा अंतर्भाव आहे .

Google Ad

या मोहिमेच्या अंमलबजावणी करीता महापालिका कर्मचा – यांची नेमणुक करण्यात आली असुन त्यांना मोहिम कालावधीत प्रति दिन १५० रुपये भत्ता देण्यात येणार आहे यासाठीच्या खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली . प्रभाग क्र .२ मध्ये विविध स्थापत्य विषयक कामे करणेसाठी २५ लाख ८ ९ हजार रुपये खर्च केले जाणार आहे . या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

36 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement