महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या २०२३ च्या पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड मनपाच्या थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
यापैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर ५३ नामनिर्देशन पत्रा पैकी ४० नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून १३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ साठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणुक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
▶️नामनिर्देशन पत्रे वैध/ अवैध ठरलेल्या उमेदवारांच्या माहितीचा तपशील :–
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१ मार्च - राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…
॥ रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा ॥ महाराष्ट्र 14 न्यूज, दि २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…
सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…