Google Ad
Uncategorized

उत्तर भारतीय बांधवांसाठी बुधवारी ‘होली मिलन’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशन, हनुमान मित्र मंडळाचा पुढाकार…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मार्च) : होळी म्हणजे रंगांचा उत्सव. या दिवशी मुक्तपणे रंगांची उधळण करून आनंद द्विगुणित केला जातो. व्यवसाय आणि कामा निमित्त पिंपरी चिंचवड शहरात स्थिरावलेले उत्तर भारतीय बांधव देखील होळीचा सण दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करतात.

सालाबाद प्रमाणे यंदाही उत्तर भारतीय बांधवांसाठी श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशन, काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळाच्या वतीने ‘होली मिलन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. ८) रोजी यमुनानगर येथील दुर्गानगर चौकातील सीजन बैंक्वेट लॉन येथे सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Google Ad

खास उत्तर भारतीय समाज बांधवांसाठी आयोजित या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-संगीत, स्वादिष्ट भोजन, लहान मुलांसाठी खेळ अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे. कार्यक्रमासाठी आयोजकांकडे सात तारखेपर्यंत पासेस उपलब्ध आहेत. समाज बांधवानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक विजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, वकील गुप्ता, उमाशंकर गुप्ता, अशोक गुप्ता, शुभम सरपाले यांनी केले आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!