Google Ad
Uncategorized

वित्तीय  क्षेत्रातील  संधी’  या विषयावरील व्याख्यानाचे यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्सच्या वतीने  आयोजन

वित्तीय  क्षेत्रातील  अमर्याद  संधींबाबत युवकांनी सजगता  बाळगावी  – सुधीर  भगत

‘वित्तीय  क्षेत्रातील  संधी’  या विषयावरील व्याख्यानाचे यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्सच्या वतीने  आयोजन

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मे) : १८ मे  २०२३ :वित्तीय  क्षेत्रात  विभिन्न  प्रकारच्या अमर्याद संधी उपलब्ध  असून त्या प्राप्त करण्यासाठी  युवा पिढीने सजगता  बाळगावी असे आवाहन महंत फिनसर्व्ह प्रा. लि., पुणे.  चे संस्थापक आणि संचालक  सुधीर भगत यांनी केले.यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅश्नल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित  ‘वित्तीय  क्षेत्रातील  संधी’  या विषयावरील  व्याख्यानात  ते  बोलत  होते. 

जागतिक  अर्थविषयक  घडामोडींचा  थेट  परिणाम  होणाऱ्या  या वित्तीय  क्षेत्रात  करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या युवापिढीने विद्यार्थिदशेपासूनच याक्षेत्राबद्दलचे ज्ञान व माहिती  अद्ययावत  ठेवण्यासाठी व्यापारविषयक वर्तमानपत्रे,नियतकालिके,मासिके सातत्याने वाचायला हवीत  असे भगत  यांनी सांगितले.भगत यांनी विद्यार्थ्यांकडून अर्थव्यवस्थापनाचे  प्रयोग करीत त्यांना या क्षेत्राबद्दलची सविस्तर  माहिती विविध उदाहरणांद्वारे सांगितली.

एमबीए फायनान्स विद्याशाखेतील  विद्यार्थ्यांनी  क्रमिक अभ्यासक्रमासोबतच याक्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे  प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण  करावेत, जेणेकरून  वित्तीय क्षेत्राविषयीची  समज व्यापक  होईल, असेही  भगत  यांनी आपल्या व्याख्यानात  सांगितले.

कार्यक्रमाच्या  शेवटी  प्रश्नोत्तर  सत्र  झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे  यांनी केले. पाहुण्यांचा  परिचय   अभिज्ञा     तर आभार  प्रदर्शन  वैशाली शिंदे या एमबीएच्या विद्यार्थिनींनी  केले. तर समन्वयक म्हणून प्रा.महेश महाकाळ  यांनी काम पाहिले.

या व्याख्यान सत्राला  एमबीए  अभ्यासक्रमाचे  विद्यार्थी  मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!