Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधील स्वराज्य प्रतिष्ठाणच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने रक्तदान शिबिर आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९ सप्टेंबर) : पिंपळे गुरव,कवडे नगर येथे सालाबाद प्रमाणे स्वराज्य प्रतिष्ठाण यांच्या कडून गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहेत या वर्षी मंडळाने २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे तरी मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षी विविध सामाजिक व मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.तसेच आमदार लक्ष्मण जगताप व माझी नगरसेवक शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व मंडळाचे मार्गदर्शक श्री.विजूशेठ जगताप तसेच डॉ.दत्तात्रय गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास ५१ रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक विजूशेठ जगताप यांनी या शिबिराचे कौतुक केले आणि म्हणाले की या मंडळासारखेच इतर मंडळांनी असे समाज उपयोगी उपक्रम करावे.

Google Ad

कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नेटके,उपाध्यक्ष सुजित तोडकरी,कार्याध्यक्ष तेजस शेखरे,खजिनदार राहुल देशनेहेरे,सचिव अंकुश दाहिभाते व मंडळाचे कार्यकर्ते अनूप कवडे,आदित्य कवडे,आदित्य जाधव,अभिजीत दळवी,संकेत जाधव,बालाजी कैटकर,तेजस नलावडे,महेश किनिकर तसेच मंडळाचे आधारस्तंभ उद्धव कवडे, अशोक कवडे,बबनराव देवकर व बाळासाहेब देवकर तसेच माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, राहुल जवळकर,रवीशेठ जाधव, भाऊसाहेब जाधव, संजय मराठे, आप्पा शिरगावे, बंडूशेठ ताकवले, सुरेश सकट, विजय मेंकुदळे आदी मान्यवर व नागरिक उपस्थिती होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!