Google Ad
Uncategorized

सोहळा शिवभक्तीचा.. जागर शिवशक्तीचा.. नवी संगवी च्या पी डब्लू डी मैदानावर परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रसाळ वाणीतून शिवकथेचे आयोजन

!!सोहळा शिवभक्तीचा.. जागर शिवशक्तीचाब!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑगस्ट ) : पिंपरी चिंचवड.. विकासाच्या वाटेवर वेगवान वाटचाल करणारी मेट्रोसिटी. या शहराला विकासाचा चेहरा देण्याचे काम भक्कमपणे केले ते लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी. शहराचा भौगोलिक विकास करतानाच त्यांनी अध्यात्म क्षेत्रात देखील भक्तिभावाने अमूल्य योगदान दिले. त्यांच्या मागेही त्यांचा परिवार हा वारसा जपत आहे. त्यांचा तोच विकासाचा आणि भक्तीचा वारसा जपताना पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच शिवभक्तीचा जागर होत, शिवशक्तीचे दर्शन घडवत, शिवशंकराच्या महिम्याचे विराट कथारुपदर्शन साकारत आहे.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ०२ ते सायंकाळी ०५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी, पिंपरीचिंचवड येथे आयोजित केलेल्या या विराट शिवभक्ती सोहळ्यात मध्य प्रदेशच्या सिहोर येथील परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा हे आपल्या अमोघ, रसाळ वाणीतून शिवकथा कथन करणार आहेत.. हा अलौकिक सोहळा दररोज याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

 !! सोहळा शिवभक्तीचा.. जागर शिवशक्तीचा..!!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!