महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑगस्ट) : पुणे जिल्हास्तरीय आंतरशालेय सिलंबम स्पर्धा – २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने दिनांक २० आँगस्ट २०२३ रोजी भोईर सभागृह, केशवनगर चिंचवडगाव, येथे पुणे जिल्हा आंतरशालेय सिलंबम स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न झाली.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध शाळेतील २९५ खेळाडूंनी सहभाग घेऊन कंबु सांदाय (काठीची लढत) कंबु विच्च (काठी फिरवीने) व्हाल विच्च (तलवारबाजी) या सारख्या विविध खेळ प्रकारात दैदिप्यमान कामगिरी केली.
या स्पर्धेमध्ये मातृ विद्यालय वाल्हेकर वाडी प्रथम क्रमांक, विद्यार्थी विचार जाधववाडी द्वितीय क्रमांक, वीरा अकॅडमी त्रितीय क्रमांक, निगडी प्राधिकरण चौथा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय सैनिक संस्थेचे अध्यक्ष लायन श्री. प्रतापराव भोसले (प्रमुख मार्गदर्शक), लायन्स क्लब आँफ पुणे इनोव्हेशन चे अध्यक्ष लायन श्री. संदिप पोलकम, लायन श्री. विनायक घोरपडे, लायन श्री एकनाथजी चौधरी, यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून रविराज चखाले, सुदर्शन सुर्यवंशी, निलम कांबळे, स्मिता धिवार, केतन नवले, साक्षी सैनी, गणेश चखाले, प्रिया सैनी, अंजली बर्वे, भार्गव देडे, रूपाली चखाले, श्रेयश चव्हाण, अर्चना अडागळे, शिवम बाबर यांनी उत्तम कामगिरी केली.
महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन चे अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न झाली. लायन श्री. प्रशांत कुलकर्णी आणि लायन श्री. नितीन चिंचवडे, विरा अकॅडमी चे संस्थापक श्री. महेश गायकवाड यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.