महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० सप्टेंबर) : लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ग्राहक जनजागृती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबिर व अभ्यास वर्गाचे आयोजन आज (दि. १० सप्टेंबर) रोजी हॉटेल कृष्णा गार्डन रेस्टॉरंट अकोले बायपास रोड, संगमनेर अहमदनगर येथे लोककल्याण ग्राहक संस्थेचे अध्यक्ष श्री दिनकर मधुकर आमकर, राजेंद्र जडे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुभाष धुमाळ म.रा. उपाध्यक्ष यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.
आज संगमनेर येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्राहक चळवळ म्हणजे काय ? याची माहीत देण्यात आली, यामध्ये ग्राहक संस्थेचे उद्देश (घटनावाचन), ग्राहक संघटनेत ( चळवळीत भाग घेण्याची गरज का आहे., पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, वजन, वस्तू, माप, तराजू, बिलमधून होणारी ग्राहकांची फसवणूक, स्थिर भाव विक्री व सरकारी योजनांची माहिती, भेसळ कशी ओळखावी व त्यानंतर त्याची कारवाई कशी करावी ?, अन्न औषध प्रशासनाची जबाबदारी, जिल्हा ग्राहक परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती, राज्य ग्राहक आयोगाची जबाबदारी, देशाच्या ग्राहक आयोगाची जबाबदारी या ११ मुद्दयासंदर्भात मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली.
ग्राहकांनी खरेदी करताना मॅन्युफॅक्चरिंग डेट, प्राईस आणि एक्सपायरी डेट बघूनच पदार्थ वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच पारदर्शक व्यवहार कसा करावा? याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शहरातून आलेले अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. संगमनेर शहरातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साधारण दोनशे सभासदांच्या उपस्थितीत आज संगमनेर आणि अकोला येथे ग्राहक सेवा केंद्र करण्याचा ठराव संमत करण्यात आला .
यावेळी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था,महाराष्ट्र यांच्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष दिनकर आमकर यांच्या हस्ते उपस्थितांना प्रशिक्षण दाखला देण्यात आला. यावेळी डॉ. मोरे राकेश साळवे ॲड, सौ अनुराधा सोनवणे, जयश्री साबळे सिरसागर मॅडम सरपंच नारायण दुधारी संतोष वरपे, सोमनाथ बाळसराफ तिकांडे खरात तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होते.
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…