आज पुणे येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्राहक चळवळ म्हणजे काय ? याची माहीत देण्यात आली, यामध्ये ग्राहक संस्थेचे उद्देश (घटनावाचन), ग्राहक संघटनेत ( चळवळीत भाग घेण्याची गरज का आहे., पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, वजन, वस्तू, माप, तराजू, बिलमधून होणारी ग्राहकांची फसवणूक, स्थिर भाव विक्री व सरकारी योजनांची माहिती, भेसळ कशी ओळखावी व त्यानंतर त्याची कारवाई कशी करावी ?, अन्न औषध प्रशासनाची जबाबदारी, जिल्हा ग्राहक परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती, राज्य ग्राहक आयोगाची जबाबदारी, देशाच्या ग्राहक आयोगाची जबाबदारी या ११ मुद्दयासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
ग्राहकांनी खरेदी करताना मॅन्युफॅक्चरिंग डेट, प्राईस आणि एक्सपायरी डेट बघूनच पदार्थ वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच पारदर्शक व्यवहार कसा करावा? याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ज्योती गुरव, सौ. अर्चना बेलवलकर, सुभाष धुमाळ, आमिर सय्यद, गिरीश जुनवणे, जनार्दन कोंडविलकर, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सौ. धनिता सुतार, महाराष्ट्र राज्य संघटक चंद्रकांत धोत्रे, सौ. विणा कर्वे श्री. शैलेश कागलकर, कु. योगेश आस्कट, महाराष्ट्र राज्य उपसंपर्कप्रमुख सौ. सुमन काते, अनिता जोशी सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी (महिला व पुरुष ) उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…