Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : वैद्यकीय उपचारांवरील निश्चित दराला विरोध ; राज्यातील सगळे डॉक्टर क्वॉरंटाईन करून घेणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य शासनाने कोरोनाचे उपचार देण्याकरिता खासगी क्षेत्रातील वैद्यकीय उपचारांसाठी जे काही दर निश्चित केले आहे , त्यामुळे डॉक्टरांवर दवाखाने बंद करण्याची वेळ असून हा अन्याय आहे . तसेच हॉस्पिटल्सच्या न परवडणाऱ्या दरात थोडीशी कुचराई झाल्यास ऑडिटर पाठवून डॉक्टरांवर कारवाया केल्या जात आहेत , या सर्वांच्या निषेधाचा भाग म्हणून राज्यातील डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असो सिएशनने सामुदायिक रित्या ‘ क्वॉरंटाईन ‘ ( विलगीकरण ) करून घेण्याचा निर्णय घेतला असून या क्वॉरंटाईनची मुदत १४ दिवसांपर्यंत असू शकेल असे म्हटले आहे . अशा पद्धतीने डॉक्टरांनी खरंच क्वॉरंटाईन करून घेतले तर याचा मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्रास होऊ शकतो .

कोरोनाच्या या काळात सामान्य जनतेला वैद्यकीय उपचार परवडावेत म्हणून , शासनाने कोरोनसाठी लागणाऱ्या उपचाराचे दर निश्चित केले आहेत . शिवाय जर या नियमाचा कुणी भंग केल्यास त्यावर रीतसर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला आहे . मात्र शासनाने जे दर ठरविले आहेत . त्यामध्ये दवाखाने चालविणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे . याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ . अविनाश भोंडवे सांगतात की , हॉस्पिटल्सच्या आयसीयुकरिता ठरवलेल्या सध्याच्या दरामध्ये ऑक्सिजन , पीपीई किट्स , बायोमेडिकल वेस्ट चार्जेस , कर्मचाऱ्यांचे पगार , निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे हॉस्पिटल्सना अवघड होत आहे .

Google Ad

त्यामुळे महाराष्ट्रातील २५००० हॉस्पिटल्सपैकी बहुसंख्य हॉस्पिटल्स बंद पडण्याची वेळ आलेली आहे . त्याकरिता हे दर वाढवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती , आणि त्यात आयएमए समवेत चर्चा करून हे दर वाढवण्याबाबत ३१ ऑगस्टपूर्वी एक बैठक घेऊन ते निश्चित करण्याचे ठरवले होते . मात्र तशी बैठक न घेता राज्याच्या आरोग्यसचिवांनी ३१ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून हे दर कायम ठेवले आणि त्यात आणखीन इतर गोष्टींची भर घालून ते परवडण्याच्या दृष्टीने आणखीन अवघड करून ठेवले . याबद्दल आयएमए महाराष्ट्र राज्याने १ सप्टेंबर रोजी या दरांबाबत ठरवलेल्या बैठकीचे स्मरण देऊन पुढील ३ दिवसांत आयएमएसोबत बैठक घेऊन या दरात फेरचर्चा करण्याची विनंती केली , परंतु आजपावेतो राज्य सरकारने त्याबाबत काहीही उत्तर दिलेले नाही .

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!