Categories: Uncategorized

पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीला एवढेंच नगरसेवक ; पक्षाच्या दोन्ही आमदारांनीही फिरवली पाठ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ जुलै): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्टवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होत आहे. तर अनेक कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करीत आहेत. तर काही आमदार अजूनही तटस्थ आहेत. यातच आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मॅरेथान बैठक पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनासाठी शहराध्यक्षांनी आयोजिलेल्या बैठकीसाठी गतवेळच्या 44 नगरसेवकांपैकी केवळ चारच नगरसेवक उपस्थित राहिले.

शहरातील दोन आमदारांनीही या बैठकीकडे पाठ फिरविल्याने स्थानिक प्रमुखांचा कल नेमका कुणाकडे? याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शहर राष्ट्रवादीमधील कोणकोणते नेते, पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी आणि मुंबईमध्ये आज (बुधवारी) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार्‍या बैठकीची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती.

नगरसेवक असलेल्या 44 नगरसेवकांपैकी शहराध्यक्ष जगताप सोडून केवळ चारच नगरसेवकांनी हजेरी लावली. बैठकीस उपस्थित राहणार्‍यांमध्ये विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब धनकवडे, वनराज आंदेकर यांचा समावेश होता. पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे द्विधा मन:स्थितीत असलेल्या बहुतांश माजी नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या शहरातील आजी माजी आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या बैठकीला हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे अनुपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील नागरिक शरद पवार यांच्या पाठीशी कायम राहिला असून आज देखील ते त्यांच्या पाठीशी आहे. सध्याची राजकीय घडामोड लक्षात घेऊन आजच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पाठीशी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत राहणार आहे. मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीला शहरातील ३०० ते ३५० कार्यकर्ते जाणार आहेत. तसेच भविष्यात कायदेशीर लढा उभा राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही शरद पवार साहेबांसोबत असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लिहून घेतले जाणार असल्याचं शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

4 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

6 days ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

6 days ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

6 days ago

चिंचवड मतदारसंघातील धनगर समाजाची ताकद शंकर जगताप यांच्या पाठीशी … शंकर जगताप यांना धनगर क्रांती सेना महासंघाचा जाहीर पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…

7 days ago