Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या फक्त या तीन केंद्रांवर मिळणार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस … तर उद्या वय ४५ वर्षांवरील नागरिकांना लस नाही!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि .३० एप्रिल २०२१) : कोविड -१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपायायोजना करण्यात येत आहेत . या उपाययोजनांपैकी नागरिकांचे कोविड -१ ९ लसीकरण करणे हा महत्वाचा घटक आहे . दि .०१ / ०५ / २०२१ पासून भारत देशामध्ये तसेच सर्व राज्यांमध्ये वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड -१ ९ लसीकरण करण्यात येणार असल्याचे मा.पंतप्रधान , भारत सरकार यांनी जाहीर केलेले आहे .

या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे .

Google Ad

🔴पिं.चिं.मनपा कार्यक्षेत्रासाठी ०३ कोविड लसीकरण केंद्रे-

▶️नवीन भोसरी रुग्णालय
▶️नवीन जिजामाता रुग्णालय
▶️प्रेमलोक पार्क दवाखाना

केद्रांची निवड करण्यात आलेली आहे . सदर केंद्रावर फक्त पुर्व नोंदणी केलेल्या उपरोक्त वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे . प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुर्व नोंदणी केलेल्या २०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे . याकामी नागरीकांनी / लाभार्थ्यांनी http://www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे . नोंदणी नसलेल्या या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी .

तसेच दि .१ / ०५ / २०२१ रोजी लस साठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची देखील नोंद घेण्यात यावी . या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , फक्त नोंदणी केलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी ३ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे .

तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे . असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

41 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!