Categories: Uncategorized

बुधवारी पवनेच्या तीरावर घुमणार किर्तनाचे स्वर … कासारवाडीतील ‘श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात’ दत्त जयंती निमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन!

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला ||

॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥

!! वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ नोव्हेंबर) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४६,बुधवार दि. २०-१२-२०२३ ते २७-१२-२०२३ श्री दत्तजयंती निमित्त निसर्गरम्य पवना पावन गंगेच्या तिरी अवघी दुमदुमली पंढरी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. याच भूमीत म्हणून संतानी दिलेल्या उपदेशाचा आजही प्रभाव समाजात आहे. त्यामुळे आजही मातृभुमीच्या कानाकोपऱ्यात टाळ व मृदुंगाच्या गजरात भजन किर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन होते.

आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या न्यायाने साधु संताचा अवतार दीन जनाच्या उध्दारासाठी असतो त्यास्तव किर्तन महोत्सवाचे आयोजन कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम येथे केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती कासारवाडी येथील श्री साईसेवा कुंज आश्रम यांच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवार दि. २०/१२/२०२३ वेळ : सकाळी ९.०० वा. शुभहस्ते प.पू. श्री. शांतीब्रम्ह ह.भ.प. मारुती महाराज कुन्हेकर (बारकरी शिक्षण संस्था, आंदी) प. पू. श्री. मंदार महाराज देव (मोस्या देवस्थान ट्रस्ट, चिंचवड), प. पू. श्री. पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे (चिंचवड)

तसेच मा. प्रा.श्री. तानाजीराव जयवंतराव सावंत ( आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य ), मा. श्री शंकरशेठ पांडुरंग जगताप (अध्यक्ष पिं.चिं. भारतीय जनता पार्टी ), मा. श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ लोकसभा), मा. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (आमदार चिंचवड विधानसभा), मा. श्री महेशदादा लांडगे ( आमदार भोसरी विधानसभा), मा. श्री अण्णा बनसोडे (आमदार पिंपरी विधानसभा), मा. श्री विलास विठोबा लांडे (माजी आमदार), मा. सौ. उषाताई (माई) ढोरे (माजी महापौर पिं. चिं.), मा. श्री. हनुमंतराव गायकवाड (बी.व्ही.जी. ग्रुप चेअरमन), मा. श्री विजय पांडुरंग जगताप ( आदर्श उद्योजक), मा. श्री विजय आप्पा रेणूसे ( सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती), मा. बाळासाहेब काशीद ( अध्यक्ष भंडारा डोंगर देवस्थान), मा. प्रकाश नामदेव काटे (आदर्श उद्योजक) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

▶️असा आहे, किर्तन महोत्सव

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

6 days ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

2 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

2 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago