Google Ad
Editor Choice

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांनी शुभेच्छा देणारे पोस्टर लावले? … या प्रश्नावर अजितदादा भडकले, अन म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जुलै) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही अजितदादांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावले आहेत. याबाबत विचारण्यात आलं असता अजितदादा पत्रकारांवरच भडकले. गुन्हेगारांना मी होर्डिंग्ज लावायला सांगितल्या होत्या का?, असा उलट सवालच अजितदादांनी पत्रकारांना केला.

अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. उद्या त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज शहरात लागले आहेत. अजितदादांनी मनाई करूनही हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावले आहेत. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले. खासकरून गुन्हेगारांच्या होर्डिंग्जकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावेळी अजितदादा चांगलेच भडकले. गुन्हेगारांना होर्डिंग्ज लावायला मी सांगितलं होतं का? वाढदिवसानिमित्ताने होर्डिंग्ज लावू नका, बॅनरबाजी करू नका, असं आवाहन मी केलं होतं. माझ्या सद्सदविवेकबुद्धिला स्मरून मी हे आवाहन केलं होतं. उद्याच्याला कोणी काय केलं ते चुकीचं असेल तर पोलिसांनी अॅक्शन घ्यावी. त्यांना कारवाईसाठी कधीच बंदी केलेली नाही, असं अजितदादा म्हणाले.

Google Ad

पिंपरी-चिंचवडमध्ये मी आज येत नाही महाराज, मी अनेक वर्षांपासून येतो. पिंपरी चिंचडवकरांना माझी सर्व मते स्पष्टपणे माहीत आहेत. तुम्ही काही तरी नवी गोष्ट काढण्यासाठी कोणता तरी मुद्दा सोडायचा आणि प्रश्न विचारायचे हे धंदे बंद करा, असा दम भरतानाच अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं नाही. एक मिनिट… मी नियमांचं पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीची लागले असेल तर भाजपची सत्ता आहे. आयुक्त महापौरांनी किंवा शहराचं कामकाज ज्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यावर कारवाई करावी, असं अजितदादा म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

47 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!