Google Ad
Editor Choice Sports

योग दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 6.30 वाजता जनतेशी संवाद साधणार

महाराष्ट्र 14 न्यूज : उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 21 जून 2021 हा आपण 7 वा योग दिवस साजरा करणार आहोत. या वर्षाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ अशी असेल. जी शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर केंद्रीत आहे. सकाळी 6.30 वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमाला मी संबोधित करेन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू हेदेखील संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. विविध ठिकाणी त्या-त्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहे. मात्र, सर्वत्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एका ठिकाणी 20 पेक्षा अधिक लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत.

Google Ad

हे वाचा – 7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सार्वजनिक योग कार्यक्रमात अधिक लोकांना समावेश करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या भाषणानंतर सकाळी योगा केला जाईल. लोकंही व्हर्चुअल माध्यमातून या योग कार्यक्रमात हजेरी लावतील. त्यानंतर अध्यात्मिक आणि योग गुरू लोकांना संबोधित करतील, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल सकाळी 7 ते 7.45 वाजेपर्यंत मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमावेत लाल किल्ला परिसरात योग करणार आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!