Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पिंपळे गुरव विभागाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त … आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना व रुग्णांना फळे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७जुलै) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि.२७जुलै) रोजी पिंपळे गुरव विभागाच्या वतीने पिंपळे गुरव आरोग्य विभागतील महिला कर्मचारी व शकुंतलाबाई काशीद सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी यांना मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच जुनी सांगवी येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये पेशंट व आरोग्य खात्यातील महिला कर्मचारी यांना फळ वाटपाचा तसेच नवी सांगवी, साई चौक येथील आरोग्य कर्मचारी यांना देखील फळ वाटप करण्यात आले.

Google Ad

त्यावेळी शहर समन्व्यक विजयराज साने, समन्व्यक दिपक ढोरे,विभाग प्रमुख, चेतन शिंदे, अमित सुवासे, अमित निंबाळकर,उपविभाग प्रमुख मंगेश लोखंडे, प्रशांत कडलग, सिकंदर अण्णा पोंगडे,मा. महिला जिल्हाप्रमुख स्वरूपा खापेकर ताई, सचिन बोडके, शाखा प्रमुख लक्ष्मण गायकवाड, विनोद लोखंडे, सुमित पडळघरे पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!