महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : संत सज्जनांचा सहवाससुद्धा एखाद्या आशीर्वादाइतकाच मोलाचा आणि पवित्र असतो. त्यांच्या उपदेशाचे बोल, मायेचा स्पर्श आणि त्यांचे सानिध्य आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाणारे असते. असंख्य भाविकांच्या गुरूस्थानी असणारे सद्गुरू नारायणमहाराज उर्फ अण्णामहाराज यांच्या सहवासात त्याचाच प्रत्यय आला. औचित्य होते, अण्णामहाराजांच्या वाढदिवसाचे!…
अण्णा महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अप्पा रेणुसे, उद्योजक विजयशेठ जगताप, श्री गणेश सोनवणे यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेकडो भक्तांच्या व भाविकांच्या उपस्थितीत सर्वांनी अण्णामहाराजांना दीर्घायुष्य चिंतले. या वेळी त्यांना चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे व अण्णा महाराजांना सन्मानित करण्याचे भाग्य लाभले याचा आनंद मोठा होता. अतिशय उच्च दर्जाचा धार्मिक आणि भव्य दिव्य असा सोहळा झाला.
या वेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते मा. उल्हासदादा पवार, आमदार संजय जगताप, उत्कृष्ट प्रवचनकार भाषाप्रभू ह. भ. प. पंकजमहाराज गावडे, प्रख्यात अभिनेते मा. श्री. मकरंद अनासपुरे, दादा काटे ,पोपटराव सुके, अण्णा सरपाले, आदरणीय भिंताडे वहिनी, तात्यासाहेब भिंताडे, जी. ए.भिलारे साहेब, विलासराव भणगे उपस्थित होते.
उल्हास दादा पवार व भाषाप्रभू डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या अमोघ वाणीने सर्व भक्तजनांना मंत्रमुग्ध केले यावेळी हजारो भक्तजन भाविकतेने उपस्थित होते त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अण्णा महाराजांच्या आशीर्वाचनाने व भरत नाना शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध सोहळा पार पडला. दत्त महाराजांच्या जयघोषात व पसायदानाने सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…