Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वटवृक्ष फाऊंडेशनच्या वतीने आयुष रुग्णालयात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ एप्रिल) : वटवृक्ष फाऊंडेशनच्या वतीने आज (०५ एप्रिल) रोजी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी करण्यात आले होते.

शंकरभाऊ पांडुरंग जगताप हे लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत, त्यांनी लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा आलेख आणि वसा आहे तसाच उंचावत पिंपरी चिंचवड शहरात आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे, यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५ एप्रिल रोजी भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच या प्रसंगी वटवृक्ष फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनचे उद्दिष्ट शहरात झाडे वाढविणे आणि जगविणे पर्यावरणाच्या रक्षणासाठी सातत्यपूर्ण काम करणे, उन्हाळ्यामध्ये वृक्षांचे रक्षण करणे हे होय.

Google Ad

आज या वृक्षारोणाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले पिंपरी चिंचवड हरित करुया आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावुया अशी शपथ घेतली. हा वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी ०९.०० वा राजमाता जिजाऊ उद्यान जवळ, पिंपळे गुरव, ०९.३० वा पी डब्ल्यू डी मैदान, नवी सांगवी तर १०.३० वा. आयुष हॉस्पिटल, (औंध जिल्हा सामान्य रुग्णालय) या ठिकाणी घेण्यात आला.

या वेळी औंध जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष रुग्णालयात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि वृक्षांचे रोपण करण्यात आले, या वृक्षारोपण कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. श्रीनिवास कोलाड, डॉ. बालाजी लकडे, डॉ.वाणी, गणेश सहकारी बँकेचे संचालक सुरेशदादा तावरे, विक्रम भेगडे, सखाराम रेडेकर, राजबाबू सरकनिया, किशोर लालबेगी, अभय नरडवेकर, भाऊसाहेब जाधव, संदिपान सामसे, राजू नागणे, संदीप दरेकर, प्रवीण पाटील, विशाल खेरे रुग्णालयातील परिचारिका तसेच शंकरभाऊ जगताप मित्र परिवार आणि वटवृक्ष फाऊंडेशन सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!