Categories: Uncategorized

रामनवमी निमित्ताने नवी सांगवी-पिंपळे गुरव, सांगवी परिसरात महिलांची दुचाकी शोभायात्रा प्रचंड उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 30 मार्च) : प्रभू श्रीराम यांची जयंती म्हणजेच रामनवमी उत्सव गुरुवार ३० मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आला. यानिमित्त शहरातील सांगवी येथील राममंदिरांमध्ये रामजन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता तर रॅली, मिरवणुकांसह सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमदेखील घेण्यात आले. शहरात दिवसभर रामनामाचा गजर करण्यात आला.रामनवमी निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात रामभक्तांमध्ये आज मोठा उत्साह दिसून आला. शहरातील पिंपरी गाव, चिंचवड गाव, मोशी, वाकड, चो,-होली, भोसरी, कासारवाडी, राहटणी, सांगवीसह विविध मंदिरांमध्ये रामनामाचा जाप करण्यात आला. अनेक राममंदिरांमध्ये दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. प्रभू रामांची यथासांग पूजा करून मानाची आरती करण्यात आली. यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच राममंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी रामभक्तांची मोठी गर्दी दिसून आली. सदरील सोहळ्यांमध्ये लोकप्रतिनीधींसह संस्था, संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांच्यासह नागरिकांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

प्रभु श्रीराम नवमीचे औचित्य साधून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत प्रभू श्रीरामचंद्र यांची नवमी अर्थात चैत्र शुद्ध नवमी
*श्रीराम नवमीनिमित्त* नवी सांगवी येथून सायंकाळी महिलांनी काढण्यात दुचाकी (रॅली) मिरवणुकित भगव्या पताकांनी आणि भरजरी भगव्या फेट्यानी आणि राम नामाच्या जयघोषानी नवी सांगवी- पिंपळे गुरव आणि सांगवी गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. सांगवी गावात निघालेल्या या मिरणुकीत प्रभू राम यांची मुर्ती ची मिरवणूक काढण्यात आली होती. तर काहींनी सजीव देखावेही उभारले होते. रथ फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. भगवे वस्त्रधारी रामभक्तांकडून यावेळी जय श्रीरामच्या घोषणेने आसमंत दुमुदूमून गेला होता.

 

Maharashtra14 News

Recent Posts

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

9 mins ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

7 hours ago

हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ता रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला … अजित दादा काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…

2 days ago

राखीच्या धाग्याने विणला ‘बहीण भावाच्या’ नात्याचा विश्वास’! पिंपळे गुरव येथे सौ पल्लवी जगताप यांच्या कडून अंध अनाथ कल्याण केंद्रात अनोखा रक्षाबंधन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…

2 days ago

आमदार ‘शंकर जगताप’ यांनी आयोजित केलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात ७५३ तक्रारींचे निराकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…

3 days ago

पिंपळे गुरव येथील ‘ब्रिलियंट स्टार प्री स्कूल’ मध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…

3 days ago