Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त … शत्रुघ्न काटे युथ फौंडेशन आणि उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त शत्रुघ्न काटे युथ फौंडेशन आणि उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने भव्य भजन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ७.०० वा. पर्यंत विमल गार्डन, राहटणी येथे करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या या भव्य भजन स्पर्धेचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते तसचे ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी ), ह भ प संतोष महाराज पायगुडे, ह भ प सतिश महाराज काळजे, ह भ प गरुड गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Google Ad

शुद्ध सांप्रदायिक भजना करीता चांगल्या सांप्रदायिक तरुण भजन करणाऱ्यां मंडळींना प्रोत्साहन मिळावे म्हणून नगरसेवक शत्रुघ्न ( बापू ) काटे, नगरसेवक सुरेश भोईर आणि कुंदाताई संजय भिसे अध्यक्षा भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत . संत नामदेव महाराजांनी ‘ वारकरी कीर्तनाची मुहूर्तमेड रोवली, वारकरी कीर्तनाची सुमारे ८०० वर्षांची समृध्द परंपरा आहे . ‘ भजन ‘ हे भक्ती आणि भागवत धर्म प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक , राजकीय , धार्मिक जागृतीत ‘ भजन आणि कीर्तनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे . आजकाल भजनाला शुध्द सांप्रदायिक चौकटीला धक्का लागण्याची भिती निर्माण झाली आहे . कीर्तनातील निरुपण आणि भजन हे दोन्हीही लोकरंजनाकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे . नव्या पिढीला शुध्द सांप्रदायिक भजनाची चौकट कळावी व त्या चौकटीत भजन करण्याला प्रोत्साहन मिळावे , या उद्देशाने ‘ शत्रुघ्न काटे युथ फौंडेशन आणि उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भजन सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

🔴अशी असतील भजन स्पर्धेची पारितोषिके :-

प्रथम क्रमांक रु. ११०००/-
द्वीतीय क्रमांक रु.९०००/-
तृतीय क्रमांक रु.७०००/-
चतुर्थ क्रमांक रु.५०००/- ,
पाचवा क्रमांक रु.३०००/-

अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत करावी असे संयोजकांच्या वतीने कळविले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!