महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आजपासून सुरू करण्यात आली. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” शुभारंभ शासन स्तरावरुन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला .
तसेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “ हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” शुभारंभ सावतामाळी मंदीर, चिखली घरकुल, प्राथमिक शाळा, जाधववाडी येथे करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके,माजी महापौर राहुल जाधव आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे विस्तार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्या – त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसमवेत सहभागी झाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…