Google Ad
Editor Choice

जागतिक महिला दिनानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सक्सेस ग्रुप व सुनेत्रा महिला प्रतिष्ठाण च्या वतीने … सांगवीतील व्ययसायिक महिलांना शाल, साडी, मिठाई गुलाब पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा!

महाराष्ट्र 14 न्यून, (दि.०८ मार्च) : महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सक्सेस ग्रुप व सुनेत्रा महिला प्रतिष्ठाण च्या वतीने सांगवीतील व्ययसायिक महिला कि ज्या पतीच्या खांद्याला खांदा लावुन व्ययसाय करतात, यामध्ये फुलविक्रेते, भाजीविक्रेते, वॅाशिंगसेंटर, किराणा दुकान, ब्युटी पार्लर,फळ विक्रेते,लेडीज शॅापी,कापड दुकान,मिरची काडंप, घरगुती मसाले, मच्छी विक्रेते, लेडीज टेलर,लाईट दुकान, केबल चालक,मेडिकल स्टोअर्स,महिला डॅाक्टर अशा व्यवसायिक महिलांचा दिलीप तनपुरे सर व सौ.मंदाकिनी तनपुरे यांनी त्यांच्या व्यवसायिकाच्या ठिकाणी जाऊन शाल,साडी व मिठाई देऊन सन्मान व अभिनंदन करुन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

या उपाक्रमाबद्दल व्ययसायिक महिलांनी आनंद व्यक्त केल्या.
ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे, तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे म्हणून या सर्व महिलांना दिलीप तनपुरे व मंदाकिनी तनपुरे यांनी यावेळी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!