Categories: Editor Choice

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्यावतीने पिंपळे गुरव येथे वृक्षारोपण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि. २२ जुलै) : पिंपरी चिंचवड शहरात आज २२जुलै हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात परंतु सामाजिक आणि विधायक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. शहरातील पिंपळे गुरव येथे माझा प्रभाग माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण तसेच रोपवाटप व मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आले .

पर्यावरणाचा समतोल राहावा आणि हरित पिंपरी – चिंचवडचे दादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आम्ही विविध प्रकारच्या जातींच्या झाडांचे वृक्षारोपण केले आहे, असे तानाजी जवळकर यांनी सांगितले. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक महिलांसह तरुण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे यावेळी दिसून आले .

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश ( आप्पा ) जवळकर , राष्ट्रवादी चिंचवड विधानसभा मा.अध्यक्ष शामभाऊ जगताप , युवानेते अमरसिंग आदियाल , अतुल काशीद , युवानेते तानाजीभाऊ जवळकर , पिंपळे गुरख राष्ट्रवादी महिला अध्यक्ष तृप्तीताई जवळकर उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता गणेश जगताप , राज साळुके , बाळासाहेब शेळके , सचिन भांबुरे , दत्ता कदम , किरण शेळके , निलम जवळकर , स्वाती जवळकर , प्रमीला सोनकांबळे व लक्ष्मी सूर्यवंशी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी गुजर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते .

 

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

8 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

15 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago