महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जुलै) : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेल पिंपळे गुरव कला क्रिडा संस्कार समिती आणि आदिम महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासन केंद्र शासन यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या महिला युवक यांचेसाठीच्या विनातारण, विनाजामीनदार कर्ज योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दापलीचे विभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणुन बांधकाम उद्योजक वृक्षमित्र अरूण पवार, साई सेवा वृद्धाश्रमाच्या संस्थापक प्रेमलता भांगरे गोसावी उपस्थित होत्या, प्रास्ताविक करताना आयोजक अनु. ज. सेल शहराध्यक्ष विष्णू शेळके यांनी बेरोजगार युवकांच्या समस्या आणि महिला सक्षमीकरण बद्दल बोलताना नोकरी करण्यापेक्षा देणारे का व्हावे याचे विश्लेषण करीत अशा स्वरूपाचे प्रबोधनात्मक उपक्रमांचे महत्व नमूद केलें.
शिबिरास पिंपळे गुरव परिसरातील 127 इच्छूक नवोदित उद्योग व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राहूल माळवे यांनी महिला युवकांशी संवाद साधित उद्योग व्यवसाय निर्मितीत शासनाचे योगदान आणि प्रोत्साहनपर योजना याबद्दल अत्यंत सोप्या शब्दांत मात्र समर्पक भाषेत स्पष्टीकरण देत विविध कर्ज योजनेचा लाभ घेणे पूर्वीपेक्षा कसे सुलभ आहे आणि त्याकरिता अत्यावश्यक कागदपत्रे कशी मिळवावी याबद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे हेमंत ठोंबरे यांनी मुद्रा कर्ज, स्टार्ट अप इंडिया कर्ज, उद्योगिनी, उद्योगनिधी, अन्नपूर्णा, इत्यादि कर्ज आणि त्यांच्या मर्यादा व्याजदर याबद्दल माहिती सांगत घेतलेला कर्जाचा विनियोग करताना नेमके पणाने व्यवसाय कसा उभा करावा व्यवसायात मार्केटिंगचे महत्व का आणि कसे आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. मिळणारे अनुदान कोणत्या प्रमाणात मिळते त्याचबरोबर अनेक व्यावसायिक एकत्र येवून क्लस्टर कसे करता येवू शकते याबद्दल अत्यंत सुंदर विश्लेषण केले.
प्रश्नोत्तराच्या तासाला नवोदित व्यवसाय उद्योजकांनी आपल्या अनेक शंका प्रश्न विचारले त्यावर खेळी मेळीच्या वातावरणात सर्वांचे समाधान होईपर्यंत त्यांना उत्तरे देण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुणा गारे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक बांबळे यांनी केले.