Google Ad
Editor Choice

३० सप्टेंबर रोजी ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त सलग ७५ तास कोविड -१९ लसीकरण कार्यक्रमाचा …नटसम्राट निळु फुले रंगमंदिर , पिंपळे गुरव येथे शुभारंभ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आजादी का अमृत महोत्सव निमित्त मनपाच्या ०३ लसीकरण केंद्रावर सलग ७५ तास कोविड -१९ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे .

सदर मोहिमेचा शुभारंभ मा.महापौर माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केला असून सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहून परिसरातील सर्व नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, भारतीय संस्कृती, देशाचा दैदिप्यमान इतिहास स्मरण करण्यासाठी शहरवासीयांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव चे सन्माननीय नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवीताई राजापुरे, नगरसेविका सीमाताई चौगुले तसेच माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे यांनी केले आहे.

Google Ad

 

प्रगतीशील भारताची ७५ वर्षे, भारत, भारतीय नागरिक, भारतीय संस्कृती आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचे विविध क्षेत्रांमधील यश यांचे स्मरण व्हावे, यासाठी भारत सरकारच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव भारतीय नागरिकांना समर्पित करण्यात आला असून भारतीय नागरिकांच्या योगदानामुळेच भारत आपल्या दीर्घकाळाच्या प्रवासामध्ये हा महत्त्वाचा टप्पा गाठू शकला आहे. या निमीत्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम देशातील नागरिकांसाठी सलग ७५ तास विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे

 

▶️कार्यक्रमाचे ठिकाण : –
नटसम्राट निळु फुले रंगमंदिर , पिंपळे गुरव , पुणे ४११०६१

दिनांक : ३० सप्टेंबर २०२१
वेळ :- सकाळी १०.०० वाजता .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

90 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!