महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : भारताच्या फाळणीच्या दु:खद घटनेत सर्वस्व गमावलेल्यांना नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. देशात उद्या मंगळवारी 76 वा स्वतंत्र्यता दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. आज 14 ऑगस्ट रोजी फाळणीच्या कडू आठवणींना काही नेत्यांनी उजाळा दिला. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर अनेक नागरीकांची कत्तल करण्यात आली होती.अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते, हाच तो दिवस… विभीषिका स्मृति दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातही आज १४ ऑगस्ट विभाजन विभीषिका स्मृति दिवस भारतीय जनता पार्टी सांगवी विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सांगवी येथील शितोळे नगर ते अहिल्या देवी होळकर चौक पर्यंत मूक यात्रा तसेच चित्र प्रदर्शन आणि श्री उत्तमजी दंडिमे सुप्रसिद्ध व्याखाणकार यांचे फाळणी वेदना विषयक व्याख्यान आयोजित केले होते. व्याखाणकार यांचा सन्मान भाजपा शहर अध्यक्ष. श्री. शंकर भाऊ जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना शंकरभाऊ जगताप यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मा.महापौर माई ढोरे मा. नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे तसेच मनोहर ढोरे, दिलीप तनपुरे, सोनाली शिंपी, संतोष ढोरे, हिरेन सोनवणे, युवराज ढोरे, आप्पा ठाकर, जवाहर ढोरे, मंदाकिनी तनपुरे, दर्शना कुंभारकर, सारिका भंडलकर, प्रधान सचिन थोरवे, संजय मराठे, कमलाकर जाधव, संदीप तांबे तसेच जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित दिलीप तनपुरे यांनी केले, तर आभार माई ढोरे यांनी मानले.