Google Ad
Editor Choice

आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३डिसेंबर) : आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली.

Google Ad

राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज (शुक्रवारी) मुंबईत पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!