महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना, नागरिकांकरिता सर्व सोयी सुविधा पुरवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. याचाच एक भाग म्हणून औध जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार ते औंध पोस्ट ऑफिस प्रवेशद्वार दरम्यान औंध – रावेत बी आर टी रोड च्या बाजूस असणाऱ्या कोपऱ्यातील रिकाम्या जागेवर गवत आणि झुडपे वाढली आहेत, या ठिकाणी जेष्ठ नागरिकां करिता स्वच्छता गृह बांधणे आणि रिकाम्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन आमदार शंकर जगताप यांना सर्व नागरिकांच्या वतीने देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत बी आर टी विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्यात येत आहे, हे काम करत असताना औंध रावेत बी आर टी रस्त्याच्या अंतर्गत औंध पूल ते रक्षक चौक दरम्यान सदर मुख्य रस्त्याच्या कडेला नागरिकांना चलण्यासाठी फुटपाथ आणि सायकल ट्रॅक बनवण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिक त्याचा वापर करण्यासाठी लाभ घेण्यासाठी येत असतात, त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅकवर वाकिंग करताना मध्ये विसरांती घेण्यासाठी रक्षक चौक ते सांगवी फाटा कोठेही बसण्यासाठी बाकडे नाही, तसेच ओपन जिम चे साहित्य ही नाही, ते बसवण्याची अनेक जेष्ठ नागरिकांची या बाबत मागणी आहे, आपल्या स्तरावर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन त्याची व्यवस्था करण्यास सांगावे, अशी मागणी करण्यात आली. त्यास आमदार शंकर जगताप यांनीही होकार दिला.

यावेळी सुरेश तावरे, भाऊसाहेब जाधव, भरत पेठे, शिवाजी शिंदे, सूर्यकांत गोफणे, डॉ देवीदास शेलार, कदम साहेब आदी नागरिक उपस्थित होते.


