|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला ||
॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥
!! वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे !!
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ डिसेंबर ) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४६, रविवार दि. ०८-१२-२०२४ ते १५-१२-२०२४ श्री दत्तजयंती निमित्त निसर्गरम्य पवनामाईच्या पावन गंगेच्या तिरी अवघी दुमदुमली पंढरी, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. याच भूमीत म्हणून संतानी दिलेल्या उपदेशाचा आजही प्रभाव समाजात आहे. त्यामुळे आजही मातृभुमीच्या कानाकोपऱ्यात टाळ व मृदुंगाच्या गजरात भजन किर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या न्यायाने साधु संताचा अवतार दीन जनाच्या उध्दारासाठी असतो त्यास्तव किर्तन महोत्सवाचे आयोजन कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम येथे केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती कासारवाडी येथील श्री साईसेवा कुंज आश्रम यांच्या वतीने करण्यात आली आहे.
रविवार दि. ०८/१२/२०२४ वेळ : सकाळी ९.०० वा. शुभहस्ते प.पू. श्री. गोंविद देव गिरी महाराज (श्री राम मंदिर कोशाध्यक्ष, आयोध्या), प.पू. श्री. शांतीब्रम्ह ह.भ.प. मारुती महाराज कुन्हेकर (बारकरी शिक्षण संस्था, आळंदी) प. पू. श्री. मंदार महाराज देव (मोरया देवस्थान ट्रस्ट, चिंचवड), प. पू. श्री. पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे (चिंचवड) प.पू. श्री. सुनिल भाऊ रासयणे (अध्यक्ष दगडूशेठ गणपती ट्रस्ट), प.पू. श्री. महेश सुर्यवंशी (विश्वस्य दगडूशेठ गणपती ट्रस्ट) तसेच केंद्रियमंत्री श्री. मुरलिधर किसन मोहळ (सहकारी व नागरी विमान वाहतुक केंद्रियमंत्री भारत ), मा. प्रा.श्री. तानाजीराव जयवंतराव सावंत ( मा.आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. श्री शंकरशेठ पांडुरंग जगताप (आमदार चिंचवड विधानसभा, अध्यक्ष पिं.चिं. भारतीय जनता पार्टी), मा. श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ लोकसभा), मा. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (मा.आमदार चिंचवड विधानसभा), मा. श्री महेशदादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा), मा. श्री अण्णा बनसोडे (आमदार पिंपरी विधानसभा), मा. श्री विलास विठोबा लांडे (माजी आमदार), मा. सौ. उषाताई (माई) ढोरे (माजी महापौर पिं. चिं.), मा. श्री. हनुमंतराव गायकवाड (बी.व्ही.जी. ग्रुप चेअरमन), मा. श्री विजय पांडुरंग जगताप (आदर्श उद्योजक), मा. श्री विजय आप्पा रेणूसे (सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती), मा. बाळासाहेब काशीद (अध्यक्ष भंडारा डोंगर देवस्थान) , मा. सौ. उषाताई (माई) ढोरे (सा. महापौर चिं.चि.),मा. श्री. प्रकाश नामदेव काटे (आदर्श उद्योजक) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…