Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहराकरिता … संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा (सीईटीपी) बाबत बैठक…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहराच्य औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमधून निर्माण होणा-या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा (सीईटीपी) उभारण्यात येणार आहे.  याबाबत आज महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक पार पडली.

          महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ‘क’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष दिपक करंदीकर, पारस कुलकर्णी, संदेश सॅलीयन, अनिरुध्द पंत, कांचन पंत,  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबणीस, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे अधिक्षक अभियंता एम. एस. कलकुटकी, उप अभियंता पी. सी जोशी, सहाय्यक अभियंता एस. ए. नगरकर यांच्यासह सीईटीपी फाऊंडेशनचे मिलिंद वराडकर, विवेक राऊत, संजीव शहा उपस्थित होते.

Google Ad

          या बैठकीमध्ये मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या वतीने नियोजित संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा (सीईटीपी) प्रकल्पाबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  औद्योगिक भागातील टी ब्लॉक, प्लॉट क्र. १८८ याठिकाणी  हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने नुकतीच जागा उपलब्ध करुन दिली आहे.  महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ  आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे.  त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल  (एसपीव्ही) कंपनी तयार करण्यात आली आहे.  त्याद्वारे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.  या प्रकल्पाकरीता अंदाजे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

*गुरुपौर्णिमा निमित्ताने*

पिंपरी चिंचवड शहरातील  औद्योगिक भागात वाढत्या चो-यांचे प्रमाण तसेच गुन्हेगारी घटनांसंदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.  या भागातील सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासंदर्भात डेल्टा सिक्युरिटी या कंपनीने संगणकीय सादरीकरण केले.  औद्योगिक भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे तसेच इतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी यावेळी दिले.                  

        औद्योगिक क्षेत्रात तयार होणा-या कच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी कचरा संकलन व विलगीकरण केंद्र (एमआरएफ) उभारण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.  मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजने या प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करावे अशी सूचना आयुक्त  पाटील यांनी यावेळी केली.   

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!