Google Ad
Uncategorized

ऐन दिवाळीत पावसाने उडवली गुढघाभर पाण्यातून पिंपरी चिंचवड सह सांगवीकरांची दाणादाण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० नोव्हेंबर) : सांगवी – नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागात सायंकाळी साडेसहाला मुसळधार पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे दुकानदार आणि खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली. तासभर पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला. तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.

मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर पुण्यात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

Google Ad

शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान पुण्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पाऊस बरसत असून मराठवाड्यामध्येदेखील ढग दाटून आलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ऐन दिवाळीत पाऊस कोसळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी ५ वाजता शहरातील काही भागात मुसळधार पाऊस होता. पिंपरी चिंचवड भागात पाऊस आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील सांगवी, नवी सांगवी , पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, थेरगाव परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस सुरु झाला. पिंपळे गुरव परिसरात एम एस काटे चौकात मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचलं होतं, त्यातून नागरिक आपला मार्ग काढत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या या नियोजन शुन्य स्मार्ट कामाचे नागरिकांना दर्शन झाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!