Google Ad
Editor Choice

केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजनेत ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची झाली संगणकीकृत सोडत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो त्यामुळे घरकुलच्या माध्यमातुन नागरीकांचे घराचे स्वप्न साकार होत असताना आनंद वाटत असून नागरिकांनी  त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असुन या प्रकल्पातील २ सोसायट्यांच्या इमारती मधील एकुण ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सहायक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, मुख्य लिपिक हनमंता निली,  सिद्धप्पा पाटील  कॉम्प्युटर ऑपरेटर सुनिता चौगुले पाटील लिपिक योगिता जाधव यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

Google Ad

          यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १४६ इमारत क्र. डी-६ चे अध्यक्ष  महेंद्रकुमार गायकवाड, सोसायटी क्र. १४७ इमारत क्र. डी-७ चे अध्यक्ष शिवकुमार पिल्ले यांचा अतिरिक्त आयुक्त  उल्हास जगताप यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा.  परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले.

यावेळी  सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी प्रास्ताविक करताना प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. तर मुख्य लिपिक विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!