Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने झेंडा विक्रीची नवी सांगवी -पिंपळे गुरव मध्ये सुरुवात … नागरिकांनी केली गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ ऑगस्ट) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १५ ऑगस्टला “हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने माफक दरात नागरिकांकरीता झेंडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमानसात राहावीया उददेशाने आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि.११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापनाखाजगी आस्थापनासहकारी संस्थाशैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यात येणार आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड महापालिकेने तिरंगा झेड्यासाठी निविदा काढल्या होत्या, त्यानुसार शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयात तसेच प्रभाग स्थरावर तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले असून प्रति झेंडा २४ रुपये या प्रमाणे प्रति व्यक्ती पाच झेंडे देण्यास आज सुरुवात करण्यात आली.

पहा, कसा उभारावा तिरंगा  :-

नवी सांगवी -पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह तसेच राजमाता जिजाऊ उद्यान येथे तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून एका केंद्रावर फक्त शंभर झेंडे उपलब्ध झाल्याने ते लगेचच संपल्याने काहींना निराश होऊन परतावे लागले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर  देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले  जात आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमा  अंतर्गत प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यावर्षीपासून महापालिकेच्या पिंपरी येथील  मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता  राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अशी प्रथा  सुरु करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!